Pune : पुण्यात पुढील काही दिवस तुरळक पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज –  हवामान खात्याने मान्सून लांबला ( Pune ) असल्याचा अंदाज जरी वर्तवला असला तरी पुणे शहर व आसपासच्या परिसरात 22 जून पर्यंत ढगाळ वातावरण व हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांना पावसाळ्याचा किमान फिल तरी घेता येणार आहे.

या हलक्या सरी मुळे पुण्याचे किमान तापमान सरासरी 25 अंश सेल्सीअस तर कमाल तापमान हे 32 अंश सेल्सीअसच्या आसपास राहणार असल्याने पुणेकरांना उकाड्यापासून काही प्रमाणात सुटका मिळणार आहे.

सकाळी उन तर दुपारनंतर जमा होणारे ढग व सांयकाळी पावसाच्या सरी असे काही वातावरण पुढील आठवडाभर पहायला मिळणार आहे. त्यामुळे अगदी चिंब भिजणार नसलात तरी वाफळलेला चहा, ओल्या शेंगा, मका किंवा फक्कड भजी यांचा अस्वाद पुणेकरांना नक्की घेता येईल.

Pune : पुणे पोलीस आयुक्तालयातील 12 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

तापमानापासून थोडी सुटका मिळाली असली तरी  दुसऱ्या बाजूला पुण्याला पाणीपुरवठा कऱणाऱ्या धरणांनी तळ गाठला आहे. महापालिका प्रशासनाने काही प्रमाणात पाणी कपात सुरु देखील केली आहे.

पुढच्या 15 दिवसात वरुणराजाने दर्शन दिले नाही तर मात्र परिस्थीती बिकट होणार आहे.कारण सर्वसाधारण पावसाळा जून महिन्यात सुरु होत असला तरी पुणे शहरात 1 जून पासून आत्तापर्यंत  केवळ 20.4 मीमी पावसाची नोंद झाली ( Pune ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.