Alandi : भाऊबीजेनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे मुक्ताईस साडी चोळी

एमपीसी न्यूज –  दिवाळी ( Alandi) भाऊबीजेनिमित्त बहिण श्री संत मुक्ताबाईस संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे साडी चोळी देण्यात आली .

Today’s Horoscope 16 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

काल 15 नोव्हेंबर रोजी  श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे आदिशक्ती मुक्ताईंना भाऊबीज निमित्त साडीचोळी भेट देण्यात आली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे देण्यात आलेली साडी चोळी स्नेहवस्त्र  आदिशक्ती मुक्ताईची पूजा करून मुक्ताईंना अर्पण करण्यात आली.

तसेच संत आदिशक्ती मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर यांचे वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना  श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी पाठवलेले स्नेह वस्त्र आदिशक्ती मुक्ताई संस्थानचे प्रतिनिधी ह. भ. प. विचारसागर महाराज लाहुडकर, हर्षदा लाहुडकर यांचे हस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीस स्पर्शित अर्पण करून औक्षण करण्यात आले. हे स्नेहवस्त्र श्री ज्ञानेश्र्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यानी स्विकारले.याबाबत माहिती अर्जुन मेदनकर यांनी ( Alandi) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.