Today’s Horoscope 16 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 16 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य 

आजचे पंचांग

आजचा दिवस – गुरुवार.

तारीख – 16.11.2023.

शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.

आज विशेष – विनायक चतुर्थी.

राहू काळ – दुपारी 1.30 ते 3.00.

दिशा शूल – दक्षिणेस असेल.

आज नक्षत्र – मूळ.

चंद्र राशी – धनु.
—————————–
मेष  ( शुभ रंग – पांढरा)

कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी अथक परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्याच काही जुन्या तत्त्वांना मुरड घालावी लागेल महत्त्वाच्या चर्चेत सुसंवाद साधा.

वृषभ ( शुभ रंग- क्रीम)
आज मोठे आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. नाकासमोर चालणे हिताचे राहील. गैरवर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते. आज संध्याकाळी फक्त सत्संगाकडे पावले वळवणे हिताचे राहील.

मिथुन  ( शुभ रंग- हिरवा)

केवळ मोठेपणा घेण्यासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. जोडीदाराच्या भावना जपण्याचा प्रयत्न आज कराल. नोकरदारांवर वरिष्ठांचा वरदहस्त राहील.

कर्क ( शुभ रंग – पिस्ता)

आज तुम्ही काही आरोग्याच्या तक्रारींनी त्रस्त असाल. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज वैवाहिक जीवनातील काही मतभेद संध्याकाळी निवळतील. येणी वसूल होतील.

सिंह( शुभ रंग – मरून )

आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा दिसून येईल. वैवाहिक जीवनात काही जुन्या स्मृती मनाला आनंद देतील. प्रिय व्यक्तीस आज एखादी भेटवस्तू द्याल.

कन्या ( शुभ रंग- आकाशी)

घरगुती लघुउद्योग तेजीत चालतील. आज गृहिणी घर सजावटीवर भर देतील. कलाकारांना प्रयत्न वाढवावे लागणार आहेत. आज आईच्या तब्येतीची विचारपूस करा.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी)
वास्तु व वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार आज टाळले तर बरे होईल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल. विद्यार्थी आज अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमतील.

वृश्चिक ( शुभरंग – जांभळा)

खिशात पैसा खेळता राहील. कमी कष्टात जास्त लाभ आज पदरात पडू शकतो. दुरावलेली काही नाती जवळ येतील. आज तुम्ही गोड बोलून आपल्या विरोधकांची ही मने जिंकाल.

धनु (शुभ रंग- भगवा)

आज महत्त्वाच्या चर्चेत तुम्ही आपल्याच मताशी ठाम राहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. अति स्पष्ट वक्तेपणामुळे काही आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे. वाद नकोत.

मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे घरात थोरांच्या शब्दाला मान द्यावा लागेल आज प्रवासात खाण्यापिण्यावर ताबा असू द्या.

कुंभ (शुभ रंग- डाळिंबी)

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख उंचावेल आर्थिक बाजू भक्कम असल्याने आज थोडी अनावश्यक खरेदी कराल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

मीन ( शुभ रंग- क्रीम)
आज आळस झटकून कामाला लागाल. व्यवसायातील वाढत्या स्पर्धेला यशस्वीपणे तोंड द्याल. भावनेच्या भरात कोणालाही शब्द देऊ नका. मित्रांच्या फार नादी लागू नका.

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.