Alandi : दृष्टीहीन गजानन गवळींनी पखवाज वादनातून लुटला आनंद

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नगर येथे इंद्रायणी नदी काठी (Alandi ) एका संस्थेच्या मुलांसोबत दृष्टीहीन गजानन गवळींनी पखवाज वादनाचा आनंद लुटला .त्यांच्या या पखवाज वादनाला मुलांनी टाळ्यां द्वारे प्रतिसाद देत वाहवाह केली.

Pimpri : पावसाळ्याच्या सुरवातीला वीजपुरवठा खंडित का होतो

आळंदी मधील गजानन गवळी हे दृष्टीहीन आहेत .ते त्यांच्या दृष्टीहीनतेवर मात करत लहान वयात पखवाज वादन करायला शिकले. त्यांनी अशोक पांचाळ (आळंदी) गुरुजींकडे जवळजवळ 5 ते 6 वर्ष पखवजाचे शिक्षण घेतलेले आहे. सध्या ते गोंदवलेकर आश्रमात राहतात.

दृष्टी असलेल्या व्यक्तीपेक्षा अत्यंत सफाईदारपणे ते पखवाज वादन करतात.कलेची उत्तम देणगी त्यांना लाभली  आहे. त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झाले असून ते एका हॉस्पिटलमध्ये  काम करतात. आर्थिक परिस्थिती नसल्याने या पखवाज वादनाचे पुढचे शिक्षण घेता आले नसल्याची खंत त्यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना व्यक्त (Alandi ) केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.