PMPML : पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन ते वढु बुद्रुक पर्यंतच्या पर्यटन बस मार्गाचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या बस क्रमांक सहा च्या मार्गाचे उद्दघाटन  आज (रविवारी) पुणे स्टेशन येथील पीएमपीएमएल बस स्थानकापासून झाले. पर्यटन बससेवा अल्पावधीत (PMPML ) पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सेवा सुरु करण्यात आली आहे.

पर्यटन बससेवा क्र. 6 चा शुभारंभ परिवहन महामंडळाचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे स्टेशन डेपोचे मॅनेजर संजय कुसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पीएमपीएमएल च्या पुणे स्टेशन बसस्थानक येथे वातानुकूलित ई-बस ला हिरवा झेंडा दाखवून पर्यटन बससेवा क्र. 6 चा शुभारंभ करण्यात आला. पर्यटन बससेवा क्र. 6 द्वारे पहिल्याच दिवशी 24 पर्यटकांनी सफर केली.

Alandi : दृष्टीहीन गजानन गवळींनी पखवाज वादनातून लुटला आनंद

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, सहव्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पोतदार-पवार यांच्या संकल्पनेतून पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांनजीकच्या धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता 7 पर्यटन बस मार्ग निश्चित केले असून वातानुकूलीत बसेसव्दारे विशेष पर्यटन बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या 1 मे पासून सुरू करण्यात आलेली आहे. या पर्यटन बस सेवेकरिता प्रति प्रवासी तिकी टदर 500 रुपये इतका आकारण्यात येतो.

या वेळी बोलताना महामंडळाचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे म्हणाले कि, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून किफायतशीर दरात सुरू करण्यात येत असलेल्या वातानुकूलीत पर्यटन बससेवेचा लाभ भक्तगण, भाविक व पर्यटक यांनी घ्यावा ,असे ते म्हणाले.

पर्यटन बससेवा क्र. 6 चा मार्ग व सुटण्याची वेळ.

मार्ग – पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, छ. संभाजी महाराज समाधी मंदिर (वढू बुद्रुक),

रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन.

 बस सुटण्याची वेळ – 9

 बस पोहोचण्याची वेळ – साडे पाच

 बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन बसस्थानक.

 प्रति प्रवासी तिकीट दर – 500 रूपये

 बुकिंग ठिकाण – 1) डेक्कन जिमखाना, 2) पुणे स्टेशन, 3) स्वारगेट, 4) कात्रज, 5) हडपसर गाडीतळ,

6) भोसरी बसस्थानक,7) निगडी, 8) मनपा भवन या महामंडळाच्या पास केंद्रावरून.

तरी पीएमपीएमएलच्या किफायतशीर दरात असणाऱ्या पर्यटन बससेवेचा लाभ जास्तीत जास्त पर्यटकांनी

घ्यावा असे घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात येत (PMPML ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.