Ambadas Danve : मराठा आरक्षण, केंद्र सरकारचे 9 वर्ष, महापालिका रुग्णसेवा याबाबत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केली भूमिका

एमपीसी न्यूज : नांदेड जिल्हा रुगांलायातील मृत्यू तांडवानंतर (Ambadas Danve)विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे पुणे जिल्यासह विविध जिल्ह्यातील रुग्णालयांना भेटी देऊन पाहणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला त्यांनी आज सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला.

 

रुग्णालयातील सोयी सुविधांबाबत दानवे काय म्हणाले ?

महापालिकेच्या रुग्णालयात रुबी हॉल या खाजगी रुग्णालयाकडे(Ambadas Danve) एमआरआय, सिटी स्कॅन, ईसीजी आदी सेवांबाबत कामकाज सोपविण्यात आले आहे. रुग्णालयात येणाऱ्या गरीब व गरजवंत रुग्णांना त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते, याबाबत चौकशी करणार का? किंवा त्या सेवा रुग्णांना स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी काय करणार? या प्रश्नाला उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले.

Talegaon : महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून धूम स्टाईलने पसार होणाऱ्या तिघांना अटक

महापालिकेच्या रुगणालयात दाखल होणाऱ्या रूग्णावर नाममात्र शुल्कात उपचार होणे आवश्यक आहेत. एमआरआय, सिटी स्कॅन, ईसीजी आदी सेवा रुबी हॉल यांच्याकडून पुरविल्या जात असल्यातरी महापालिकेने रुग्णांना अनुदान द्यावे. त्यांच्या खिशाला परवडेल अशी रुग्णसेवा उपलब्ध करून द्यावी.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अधिष्ठाता यांचे वायसीएम रुग्णालयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष असून त्यांचा रुबी हॉल व इतर खाजगी संस्थाकडे कामे सोपविण्याकडे अधिक कल आहे. त्यांच्या फायद्यासाठी रुग्णांची लुबाडणूक होत आहे.

असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. या प्रश्नावर बोलताना दानवे म्हणाले, वायसीएम रुग्णालय हे महापालिकेकडून जनतेच्या हितासाठी चालविण्यात येते. लोकांच्या हिताला आधी प्राधान्य दिले गेले पाहिजे. तसे होत नसेल तर कोणीही, कितीही मोठी अधिकारी अथवा व्यक्ती असल्यास त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे ते म्हणाले.

आरक्षणासाठी केंद्रसरकारने संसदेत तातडीने घटनादुरुस्ती करावी

मराठा आरक्षण प्रश्न हा अनेक वर्षांपासून सुरु आहे. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाने या आंदोलनाला धार आली आहे. त्यामुळे सरकारने मराठा समजाच्या तरुणांचा अंत पाहू नये. या आरक्षणासाठी केंद्रसरकारने संसदेत घटनादुरुस्ती करून 50 टक्के मर्यादेचा प्रश्न सोडविला तर हा प्रश्न लवकर सुटू शकतो. दिल्लीतील प्रशासकीय नियुक्तीच्या कायद्यावेळी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दाखवलेली सक्रियता या मराठा आरक्षण प्रश्ना वेळी सरकार दाखवताना दिसत नाही. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात होते. त्यांनी जाणीवपूर्वक राज्यातील या धगधगत्या विषयाकडे दुर्लक्ष केले आहे.

9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काय केले त्याचे उत्तर द्यावे !

माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी कृषी मंत्री असतांना शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शिर्डी येथील भाषणात केला, याबाबत बोलताना दानवे म्हणाले की, पंतप्रधानांनी 9 वर्षात काय केले ते त्याचे उत्तर आधी द्यावे असे म्हणत. कृषी व शेतकऱ्यांशी संबंधित स्वामिनाथन आयोग यांनी लागू करण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते, तेही लागू केले नाही. शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव मिळवून देऊ असे आश्वासन देखील त्यांनी दिले होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणार असे देखील त्यांनी सांगितले होते. मात्र आज कापूस, सोयाबीन, तूर, मुग, टोमॅटो अशा कोणत्याही शेतमालाला भाव नाही. अशा पार्श्वभूमीवर 9 वर्षात तुम्ही काय केले या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले पाहिजे, असे मत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी मांडले.

मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दाखविले काळे झेंडे

या पाहणी दौऱ्यानिमित्त अंबादास दानवे हे रुग्णालयात पोहचले असता त्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. याबाबत बोलतांना दानवे म्हणाले की, मी स्वतः या आंदोलनातला कार्यकर्ता आहे. मी मराठवाड्यातला आहे. उपोषण स्थळी मी जाणार होतो, काही कारणास्तव जाता आले नाही. मी नेहमी अंतरवली सराटी या गावात जात असतो. या आंदोलनाबाबत आमच्या पक्षाची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात स्पष्ठ केली आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.