Andheri East Bypoll : अंधेरी पूर्व विधानसभा पोटणविडणुकीतून भाजपची माघार

एमपीसी न्यूज : राजकीय (Andheri East Bypoll) घडामोडीतील एक मोठी बातमी समोर येत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. (Announce Withdraw Candidate From Andheri East Bypoll) अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमाना दिली आहे.

भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केल्याने भाजपने  ही घोषणा केली. भाजपने जरी आपला उमेदवार मागे घेतला असला तरी इतर उमेदवार अजूनही शर्यतीत असल्याने निवडणूक होण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्यासाठी ठाम होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर आज भाजपकडून आज झालेल्या बैठकीत माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मनसे नेते राज ठाकरे यांनी भाजपला उमेदवार माघार घेऊन श्रद्धांजली वाहण्याचे पत्र लिहिले होते. यालाच अनुसरून भाजपने हा निर्णय घेतला का? अशी चर्चा आता सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.