Andheri Bypoll Result : अंधेरी पोटनिवडणुकीचा आज लागणार निकाल!

एमपीसी न्यूज : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result) निकाल लागणार आहे. ऋतुजा लटके यांच्या विरुद्ध झालेल्या लढ्यामध्ये कोणाचा कौल लागणार? हे आज समजणार आहे. गेले काही महीने चर्चेत असलेली अंधेरी पोटनिवडणूक 3 नोव्हेंबर रोजी पार पडली. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

ही निवडणूक आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त (Andheri Bypoll Result) झालेल्या जागेसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. मध्यंतरी उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार अशी लढत होण्याची शक्यता होती. मात्र, भाजपने आपला उमेदवार मागे घेतल्याने लटके यांच्या विजयाच्या पायऱ्या तितक्या कठीण राहिल्या नाहीत. तरीही त्यांच्या समोर अजून सहा अपक्ष उमेदवारांची यादी आहे. त्यामुळे या निवडणुकीत लटके यांना जनतेचा कौल मिळतो का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.

पोटनिवडणुकीसाठी हे 7 उमेदवार रिंगणात

१.  ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२.  बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)
३.  मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४.  नीना खेडेकर (अपक्ष)
५.  फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६.  मिलिंद कांबळे (अपक्ष)
७.  राजेश त्रिपाठी (अपक्ष)

Vinayak Nimhan : विनायक निम्हण यांनी सर्व क्षेत्रांत ठसा उमटवला

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.