Vinayak Nimhan : विनायक निम्हण यांनी सर्व क्षेत्रांत ठसा उमटवला

एमपीसी न्यूज – शिवाजीनगरचे माजी आमदार विनायक निम्हण (Vinayak Nimhan) यांच्या कर्तृत्वाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विनायक निम्हण यांनी सर्व क्षेत्रांत ठसा उमटवला. मित्रांना मदत करणारा, माणूस म्हणून नाते जपणारा माणूस, राजकारणापेक्षा सामाजिक भान असणारा राजकारणा पलीकडचा माणूस अशी त्यांची ओळख राहिली, अशा भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केल्या.

ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर म्हणाले, विनायक निम्हण यांची पक्ष, पंथ, जात सोडून माणसे जोडणारा प्रतिनिधी अशी ओळख होती. पद, पैसा, प्रतिष्ठा याची पर्वा केली नाही. सर्व क्षेत्रांत ठसा उमटवला.

अभिनेते प्रविण तरडे म्हणाले, विनायकराव यांच्या
बोलण्यात आक्रमकता होती.बराजकारणात न पडता लेखन, अभिनय यावर करिअर कर, नाव करशील या विनायकराव यांच्या वाक्याने जीवनाला कलाटणी मिळाली.

मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, आयुष्यात माणसे जोडली, नागपूरची संत्री मिठाई पुण्यातील मित्रांसाठी आणायचे. नागपूरच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आमच्यासाठी पुण्याची आंबा बर्फी आणि बाकरवडी घेऊन यायचे.
नेत्यांच्या मागे कार्यकर्त्यांनी फिरू नये, स्वतः काम करा असा सल्ला द्यायचे, कार्यकर्त्यांना बळ द्यायचे. सर्वांना हवाहवासा वाटणारा मित्र हरपला, कायम लोकांमध्ये राहून काम करणारा मित्र हरपल्याचे अतिशय दुःख झाले आहे.

माजी मंत्री, काँग्रेस नेते विजय वडे्टीवार म्हणाले, मित्रांना मदत (Vinayak Nimhan) करणारा, माणूस म्हणून नाते जपणारा माणूस, राजकारणापेक्षा सामाजिक भान असणारा राजकारणा पलीकडचा माणूस अशी विनायकराव यांची ओळख होती.

वात्रटिकाकर रामदास फुटाणे म्हणाले, साहित्य प्रेमी, कला रसिक व्यक्तिमत्त्व हरपले. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, दीलखुलास व्यक्तिमत्त्व, शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपड, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी यांचा विनायकराव यांच्यावर मोठा विश्वास होता. हिंदू नववर्ष गुढी पाडव्याला वाजतगाजत सुरू करणारे नेते, त्यांचा स्वगृही प्रवेश आनंददायी होता.

शिवसेनेत त्यांचे स्थान ध्रुव प्रमाणे होते. त्यांनी सामान्य माणसासाठी केलेले काम पुढे नेणे आवश्यक आहे

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, विनायकराव निम्हण साहेब मनापासून मदत करणारे, खूप मार्मिक, व्यापक, सामाजिक विचार करणारे, प्रत्येक भेटीत वेगळा स्पर्श, आत्मीयता, प्रेरक भावना होती, समाजासाठी सतत काम करायचे, महत्त्वाकांक्षी व्यावसायिक, वाढदिवसाचे पत्र पाठवत होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, विनायकराव यांच्याशी (Vinayak Nimhan) राजकारणा पलीकडचे संबंध होते. ते कायम हसतमुख असत. राजकारणात कोणासमोर बदलले नाहीत. चांगले जीवन जगले. त्यांचा मोठा मित्र परिवार होता.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, नव्या पिढीला मार्गदर्शन करणारे नेता अशी विनायकराव यांची ओळख होती. त्यांचा विचार नव्या पिढीने अंगिकरावा, त्यांनी धाडसी, खेळीमेळीने काम केले. विश्वास निर्माण केला. सतत हसरा चेहरा
संकटाला सामोरे जाणारे, उत्तम राजकारण, समाजकारण करणारा, सर्व क्षेत्रांत सर्वस्पर्शी काम केले.

माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, विविध धाडस, आत्मविश्वास, चैतन्य, नवनिर्मिती, प्रत्येक क्षेत्रात स्वतचं नेतृत्व विकसित केले. कामाशी तडजोड केली नाही. करेल ते योग्यच करेन. विविध पैलू एकाच व्यक्तीमध्ये. स्वभावात तडजोड नाही केली. शंभर बेडचे समाजासाठी हॉस्पिटल करायची विनायकराव यांची इच्छा होती.

माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, आदरयुक्त दरारा असणारा, अल्प जीवनात एवढे मोठे काम करू शकतो. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व काय असते ते विनायकराव यांच्या रूपाने अनुभवले. त्यांचा सर्व क्षेत्राला परीस स्पर्श झाला. जनतेचे आंतरिक प्रेम मिळविले. चरित्र ग्रंथ झाला पाहिजे.
हे मार्गदर्शन त्यांचे कार्य सामाजिक, राजकीय, व्यावसायिकांसाठी दीपस्तंभ प्रमाणे आहे.

प्रजापिता ब्रम्हकुमारीचे सुनीता दीदी, नवले, दीपक पायगुडे, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, ॲड. श्रीकांत शिरोळे, परशुराम वाडेकर, अभिनेते प्रविण तरडे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, रा. स्व. संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे, मनसे नेते बाळा नांदगावकर, प्रशांत जगताप, विजय वडे्टीवार, रामदास फुटाणे, बापू पठारे, संजय मोरे, नीलम गोऱ्हे, आर्किटेक्ट ख्रिस्तीफर बेनजमीन, सिद्धार्थ शिरोळे, ॲड. हर्षद निंबाळकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय जगताप, आमदार अतुल बेनके, सत्यजीत तांबे, अर्जुन खोतकर, ह. भ. प. अभय टिळक, उल्हास पवार, प्रवीण दरेकर, हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Today’s Horoscope 6 November 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.