Pune News : एरंडवण्यात ‘फिरता शेतमळा’, नागरिकांना दारात मिळणार ताजा भाजीपाला

युवा सेनेचा उपक्रम

एमपीसीन्यूज : युवासेनाप्रमुख आणि पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आदित्य जनसेवा सप्ताहाचा शुभारंभ शेतकरी ते ग्राहक फिरता शेतमळा या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्या हस्ते ‘फिरता शेतमळा’ टेम्पोचे उद्घाटन करण्यात आले.

युवा सेना विस्तारक राजेश पळसकर यांच्या संकल्पनेतून एरंडवणे येथे हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या माध्यमातून बाराही महिने नागरिकांना त्यांच्या दारात ताजी आणि स्वस्त भाजी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

याप्रसंगी शिवसेना पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे, अतुल राजुरकर, उमेश भेलके, बापू निंबाळकर, राम थरकुडे, अजय भुवड, अनिल माझिरे, सोपान पौळ, युवराज शिंगाडे, कैलास मोरे, देवीदास पवार, गणेश काकडे, मयूर भालेकर, ऋषी मारणे, आकाश झांजले, अमेय कोकाटे, बापू चव्हाण, विठ्ठल इश्वरकट्टी आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.