Dapodi News : पिंपरी युवासेनेच्या वतीने संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी युवासेनेच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. दापोडी मधील एस बी पाटील स्कूल व स्वामी विवेकानंद मंदिर शाळेतील शिक्षकांना संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

प्रजासत्ताक शासनयंत्रणा, धर्मनिरपेक्ष राष्ट्राची निर्मिती आणि सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट्य भारतीय संविधानाने आपल्याला दिले आहे. संविधानात लोकशाही, समता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांना अग्रक्रम आहे. संविधान दिनानिमित्त पिंपरी युवासेनेच्या वतीने दापोडी मधील एस बी पाटील स्कूल व स्वामी विवेकानंद मंदिर शाळेतील शिक्षकांना संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

प्राचार्य घारे सर, सुभाष गारगोटे, अशोक पाटील व शिक्षक वर्ग तसेच युवा सेनेचे रवी नगरकर, अविनाश जाधव, विशाल लिंबोरे, रोहित गोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवा सेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.