ITI Apprentice recruitment : औंध आयटीआयमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

एमपीसी न्यूज : औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंध येथे सोमवार दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune News : विज्ञानभारतीतर्फे 17 डिसेंबरला आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा

शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना ही कुशल कारागीर बनवणारी योजना आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विभाग नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार आय. टी.आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी या जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्याचा आय. टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचे सहा. सल्लागार (तां). यशवंत कांबळे व उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.