Talegaon Dabhade : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व व्यापकतेने समजून घ्यावे – डॉ. संभाजी मलघे

एमपीसी न्यूज – एका ठराविक चौकटीच्या पलिकडे जाऊन व्यापक स्वरूपात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेणे ही काळाची गरज आहे. (Talegaon Dabhade) डाॅ. आंबेडकर व्यापक अर्थाने समाजासाठी समर्पित असे व्यक्तिमत्व असल्याचे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी महाविद्यालयात आयोजित केलेल्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी इतिहास विभाग प्रमुख डॉ  प्रमोद बोराडे, मराठी विषयाचे प्रा डाॅ संदीप कांबळे, प्रा सत्यजित खांडगे, प्रा मिलींद खांदवे, प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर तुमकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्राचार्य मलघे म्हणाले की, डाॅ बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्याही एका जाती धर्माचे नाहीत तर ते तेव्हा ही आणि आजही समाजातील प्रत्येक व्यक्तीचे मार्गदर्शक आहेत. कृषीतज्ज्ञ म्हणूनही  डाॅ आंबेडकरांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे.

Chikhali News : विवाहितेची कीटकनाशक पिऊन आत्महत्या, पती व सासू-सासऱ्यांना अटक

यावेळी बोलतांना प्रा खांडगे म्हणाले की, बाबासाहेबांच्या लेखन,भाषण आणि पक्षीय राजकारणाच्या गाभ्यात स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यत्रयींच्या संदर्भात मुलभूत चिंतन सापडते.(Talegaon Dabhade) समतेच्या तत्वावर समाजाची पुनर्बांधणी करणाऱ्या बाबासाहेबांचे विचार प्रत्येकांने अंगीकारायला हवेत.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा डाॅ प्रमोद बोराडे यांनी केले. यावेळी बोलताना बोराडे म्हणाले की, तळेगाव दाभाडे व आसपासचा परिसर बाबासाहेबांच्या वास्तव्याने पावन झालेला आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. (Talegaon Dabhade) विद्यार्थांनी अशा ठिकाणांना भेटी देऊन बाबासाहेबांना अजून चांगल्या पद्धतीने समजून घ्यावे. बाबासाहेबांचे विचार आपण जगलो तर सामाजिक समतेची प्रभावी स्थापना लवकर शक्य होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ संदीप कांबळे यांनी केले तर राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा मिलिंद खांदवे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.