Pune News : विज्ञानभारतीतर्फे 17 डिसेंबरला आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा

एमपीसी न्यूज : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विज्ञान प्रसारासाठी कार्यरत विज्ञानभारती संस्था आणि केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 17 डिसेंबरला आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे.

‘स्वातंत्र्यलढ्यात शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक संस्थांचे योगदान’ या संकल्पनेवर आधारित ही प्रश्नमंजुषा स्पर्धा असणार आहे. मराठी, इंग्लिश, सेमी इंग्लिश आणि हिंदी माध्यमातील आठवी व नववीच्या मुलांसाठी असलेली ही स्पर्धा दोन फेऱ्यांत होईल. यस्पर्धेत विनामूल्य सहभाग नोंदवता येईल. तीन विद्यार्थ्यांचा एक संघ याप्रमाणे शाळांनी नोंदणी करावी.

Pune News: ‘सोनिया शक्ती’ विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ देईल : सतेज पाटील

स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाणार असून, प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाना अनुक्रमे 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. सहभाग नोंदवण्यासाठी https://cutt.ly/VB-PM-A-QC ही लिंक वापरावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी घनश्याम जोशी (9764814943) यांच्याशी संपर्क साधावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.