Chikhali News : विवाहितेची कीटकनाशक पिऊन आत्महत्या, पती व सासू-सासऱ्यांना अटक

एमपीसी न्यूज – सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. त्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News: ‘सोनिया शक्ती’ विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ देईल : सतेज पाटील

याप्रकरणी मयत विवाहितेच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती अक्षय कन्हैयालाल जाधव (वय 29 रा. चिखली) सासरे कन्हैयालाल किसनलाल जाधव (वय 59) सासू यांना अटक केली असून नणंद व तिचा पती संजय गांधिले यांच्यावरही गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी हिचा विवाह अक्षय याच्या सोबत 20 मे 2022 मध्ये झाला होता. मात्र अवघ्या सहा महिन्यातच सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने बुधवारी (दि.7) विष पिऊन आत्महत्या केली आहे. अक्षय हा तिला मारहाण करत असे व सासु-सासरेही घरातील कामावरून टोमणे मारून तिला मानसिक त्रास देत होते. याला कंटाळून विवाहितेने कीटकनाशक पिऊन आपले जीवन संपवले. चिखली पोलिसांनी तिघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.