Alandi : माउली-माऊलीच्या नामघोषात माऊलींच्या पालखीचे अलंकापुरीमध्ये आगमन

एमपीसी न्यूज – टाळ मृदुंगाच्या व हरिनामाच्या गजरात व माऊली-माऊलीच्या नामघोषात माऊलींच्या पालखीचे आज सायंकाळी साडे सहाच्या सुमारास  अलंकापुरीमध्ये आगमन झाले.

Bhosari : एक कॉल अन् पोलिसांची धावपळ

माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी थोरल्या पादुका ते आळंदी (नगरपालिका चौक) येथे ठिक ठिकाणी मोठी गर्दी केली होती. आळंदी (Alandi )  हवेली विभागात  फटाक्यांची अतिषबाजी पालखीचे स्वागत करण्यात आले.

 

आळंदी मध्ये पालखीने प्रवेश केल्यावरती भाविकांनी माऊली माऊलीच्या नामघोषात व  टाळ्यांच्या कडकडाटात माऊलींच्या पालखीचे स्वागत केले.यावेळी वारकरी विद्यार्थ्यांनी फुगडीचा आनंद लुटला. माऊलींच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. परतीच्या वारकऱ्यांसाठी ठीक ठिकाणी चहा, पाणी, अन्नदानाची सुविधा माऊलीं भक्तांनी केली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.