Bhosari : एक कॉल अन् पोलिसांची धावपळ

एमपीसी न्यूज – एटीएम फोडल्याचा एक कॉल आला अन भोसरी पोलिसांची धावपळ उडाली. पण एटीएम फोडल्याचा प्रकार नसून दोघांनी त्यांच्या खात्यातून पैसे काढले असल्याचे समोर आले आहे.

PCMC : डासउत्पत्ती स्थळे तात्काळ नष्ट करावीत, अन्यथा कठोर कारवाई; पालिकेचा इशारा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, हरियाणा येथून पिंपरी-चिंचवड येथे दोघेजण कार कॅरिअर कंटेनर घेऊन आले. इथे आल्यानंतर त्यांनी भोसरी मधील साधना बँकेच्या एटीएम मधून सात हजार रुपये काढले. ते पैसे त्यांना एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये जमा करून गावी पाठवयाचे होते.

दरम्यान, पोलिसांना कॉल आला की, भोसरी मधील साधना बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न होत आहे. ही माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिथे असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

घटनास्थळाची पाहणी करून त्यांच्याकडे चौकशी केली असता एटीएम फोडल्याचा कोणताही प्रकार नसल्याचे समोर आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.