Assembly Election Result : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल ; 8 वाजता मतमोजणीला सुरुवात

एमपीसी न्यूज – देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. पाच (Assembly Election Result ) राज्यांपैकी राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज रविवारी 3 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून  8 वाजता मतमोजणीला सुरुवात देखील झाली आहे.मिझोराम विधानसभेची मतमोजणी उद्या  सोमवारी 4 डिसेंबर रोजी होईल. या राज्यांमध्ये कोणता पक्षाकडे बहुमत जाऊन बाजी  मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.हा निकाल अवघ्या काही तासांवर  येऊन ठेपला आहे.

Pimpri : जनता लय अवघड; विचार करून मतदान करते – जयंत पाटील

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ,मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसबहुमताच्या जवळ असून काँग्रेसला 111 ते 121 आणि भाजपला 106 ते 116 जागा मिळतील तर र राजस्थानमध्ये भाजपला 100 ते 110 आणि काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळतील.तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री के. सी आर यांच्या बीआरएस आणि कॉंगेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये लढत होईल. एक्झिट पोलनुसार भाजपला येथे केवळ 5 ते 10 जागांवर समाधान मानावे लागेल.

तर प्रमुख लढती असलेल्या बीआरएसला 48 ते 58 आणि काँग्रेसला 49 ते 59 असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, येथे एमआयएमची भूमिका ही किंगमेकरची असणारा आहे. एमआयएमला येथे 6 ते 8 जागा मिळतील असे एक्झिट पोल सांगत आहे तर छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांपैकी कॉंग्रेसला 46 ते 56 तर भाजपला 30 ते 40 जागा मिळण्याची शक्यता आहे .

मतदारांचा कौल की एक्झिट पोलने वर्तविलेला अंदाज खरा ठरणार,  हे चित्र काही तासात (Assembly Election Result ) स्पष्ट होईल.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.