Talegaon Dabhade : क्रीडापटू सेजल मोईकरचा रामदास काकडे यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज – सुदवडी गावचे वैभव म्हणून ओळख असलेली (Talegaon Dabhade ) तसेच नॅशनल बेंच प्रेस चॅम्पियन (National Bench press champion) कुमारी सेजल विश्वनाथ मोईकर हिचा सन्मान इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष,उद्योजक रामदास काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच रामदास काकडे यांनी गावचे सरपंच सुमित कराळे यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमासाठी मावळचे माजी सभापती विठ्ठल शिंदे,इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त निरूपा कानिटकर,संजय साने,कैलास मोईकर, माजी चेअरमन D.O.D, माजी उपसरपंच नितीन ताठे,रमेश कराळे,अवतार शिंदे,राहुल कराळे, सँडविक इंडिया कंपनीचे मॅनेजर बाबाजी खेडेकर उपस्थित होते.

Assembly Election Result : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल ; 8 वाजता मतमोजणीला सुरुवात

सेजल विश्वनाथ मोईकर हिने बँगलोर येथे 24 नोव्हेंबर  2023 रोजी झालेल्या बेंच प्रेस चॅम्पियन स्पर्धेत नॅशनल ज्युनियर गटात सुवर्ण पदक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच राजश्री विनायक वाघचौरे यांनी वरील स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. या दोघींच्या या यशाबद्दल रामदास आप्पा काकडे यांनी त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सत्कार सोहळ्याचे नियोजन शांताराम कराळे पाटील यांनी केले. ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे,असे प्रामाणिक मत व्यक्त केले तसेच सेजलला पूर्ण खेळासाठी आणि शिक्षणासाठी पाठिंबा देण्याचे सहकार्य तसेच योग्य ती मदत संस्था करेल असा विश्वास अध्यक्ष काकडे यांनी व्यक्त केला.

सुदवडी गावच्या वतीने सरपंच सुमित कराळे यांनी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाचे ऋण व्यक्त केले आणि सेजलला पूर्ण मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद (Talegaon Dabhade ) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.