Sangavi News : अटल महाआरोग्य शिबिरात सव्वा लाख रुग्णांची तपासणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवीतील (Sangavi News) पीडब्ल्यूडी मैदानात आयोजित दोन दिवसीय मोफत अटल महाआरोग्य शिबिराला भरभरून प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल सव्वा लाख रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.

आजार बळावलेल्या 35 हजारहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे ह्दयरोग झालेल्या सुमारे 4 हजार जणांवर मोफत उपचार करण्यात आले. शिबिराच्या ठिकाणी तीन हजारहून अधिक मुला-मुलींचे मोफत समुपदेशन करण्यात आले. 50 हजार जणांना चष्म्यांचे, 450 जणांना श्रवणयंत्रांचे आणि 150 दिव्यांगांना जयपूर फूट, कॅलीपर्स, व्हिलचेअर आणि चालण्याच्या काठीचे मोफत वाटप करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून शहरात दरवर्षी मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले जाते. स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, सामाजिक कार्यकर्ते डॉ. देवीदास शेलार, सतीश कांबळे यांनी पाचव्या वर्षी या महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले.

यंदाच्या शिबिरासाठी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील अनेक नामांकित रुग्णालय, तेथील तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करण्यात आले होते. या तज्ज्ञ डॉक्टरांनी लहान बालकांपासून वयोवृद्धापर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांची तपासणी आणि त्यांच्यावर मोफत उपचार केले.(Sangavi News) आजारावर शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांवर संबंधित रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. या शिबिरात सहभागी रुग्ण व त्यांच्यासोबतच्या नातेवाईकांसाठी जेवण, चहा व पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. रुग्णांच्या तपासणीसाठी एमआरआय, सिटी स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी, ईसीजी, रक्तासंदर्भातील सर्व चाचण्या करण्यासाठी शिबीराच्याच ठिकाणी यंत्रसामग्री उपलब्ध करण्यात आली होती.

Pune News : अग्रोदय अधिवेशनात 28 व्यक्तींचा सन्मान

अत्यावश्यक सेवेसाठी डॉक्टरांची स्वतंत्र टिम ठेवण्यात आली होती. उपचारासोबतच मोफत औषधांचे स्टॉलही लावण्यात आले होते. स्त्रियांचे आजार व कर्करोग यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दिव्यांगांसाठी ओपीडी, स्ट्रेचर व औषधांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या शिबीरात रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया, मोफत अॅन्जिओग्राफी, दिव्यांगांना जयपूर फूट व कॅलीपर्सचे मोफत वाटप, चष्मे व श्रवणयंत्रांचे मोफत वाटप, ह्दयरोग तपासणी व शस्त्रक्रिया, दंतरोग, नेत्ररोग, त्वचा विकार, हाडांचे आणि मणक्यांचे आजार, श्रवणदोष, प्लास्टिक सर्जरी, आयुष, किडनी व मुत्रमार्गाचे विकार, फीट्स, कान-नाक-घसा, गरोदरमाता तपासणी, मेंदुची शस्त्रक्रिया, रक्तदाब व मधुमेह, स्त्रीरोग तपासणी, फाटलेले ओठ व टाळुवरील शस्त्रक्रिया, बालरोग व शस्त्रक्रिया, किशोरवयीन मुला-मुलींचे समुपदेशन, हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.

शंकर जगताप म्हणाले, “पैशाअभावी अनेकजण आजारावर उपचार घेत नाहीत. अशा गोरगरीब व उपेक्षित लोकांवर या अटल महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून मोफत उपचार, औषधे व शस्त्रक्रियेची जबाबदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरासाठी माजी महापौर उषा  ढोरे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, ममता गायकवाड, माजी नगरसेविका झामाबाई बारणे, माधवी राजापुरे, उषा मुंढे, शारदा सोनवणे, शोभा आदियाल, वैशाली जवळकर, सविता खुळे, सुनिता तापकीर, मनीषा पवार, निर्मला कुटे, आरती चोंधे, अश्विनी चिंचवडे, संगीता भोंडवे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, सांगर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, बाबासाहेब त्रिभुवन, शशिकांत कदम, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, बाळासाहेब ओव्हाळ, संतोष कांबळे, संदिप कस्पटे, विनायक गायकवाड, अभिषेक बारणे, मोरेश्वर शेडगे, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, विभीषण चौधरी, संदीप गाडे, गोपाळ माळेकर, गणेश बँकेचे अध्यक्ष संजय जगताप, सामाजिक कार्यकर्त्या कुंदा भिसे, कल्पना जगताप, उर्मिला देवकर, शोभा जांभुळकर, पल्लवी जगताप,

कावेरी जगताप, राणी कौर, करिष्मा बारणे, पल्लवी वाल्हेकर, भाजपचे पदाधिकारी योगेश चिंचवडे, विनोद तापकीर, माऊली जगताप, शेखर चिंचवडे, संजय भिसे, संदिप नखाते, नितीन इंगवले, तानाजी बारणे, मधुकर बच्चे, काळूराम बारणे, सनी बारणे, डॉ. गणेश अंबिके, डॉ. प्रदीप ननावरे, संतोष ढोरे, जवाहर ढोरे, अजय दुधभाते, कृष्णा भंडलकर, बाळासाहेब देवकर, संजय मराठे, संदिप दरेकर, (Sangavi News) शिवाजी निम्हण, सुनील देवकर, अमोल जवळकर, भूषण गोरे, विजय माने, दत्ता कांबळे, आदेश नवले, हिरेन सोनवणे, आशिष जाधव, आप्पा ठाकर, शशिकांत दुधारे, स्वाती जाधव, सखाराम रेडेकर, शंकर लोखंडे, राजू मोरे, रविंद्र गुरव, साई कोंढरे, अमर आदियाल, गणेश घोजगे, दिपक गोटे, प्रसाद कस्पटे,

राहुल जवळकर, संजय बाईत, राजेंद्र येडे, अक्षय खाडे, अनिल कांबळे, दिलीप तनपुरे, मिलिंद कंक, साहिल शेख, अमित शिंदे, गणेश कवठेकर, संदीप कोकरे, भूषण गोरे, विजय माने, सूरेश शिंदे, अमित साखरे, राजेश बटुळे, अशोक गाढवे, प्रसाद देवकर, नवनाथ जांभुळकर, शिवाजी कदम, शिवाजी रावडे, तुषार साळुंके, शशांक कांबळे, प्रवीण चौधरी, गणेश जगताप, शांताराम पिंजण, पंकज रोकडे, किरण समिंदर, जीवन जाधव, राजू जगताप, गीतेश दळवी, सुदर्शन बाराहाते, शैलेश बासुतकर, सचिन सावंत, अतुल पाटील, सचिन सावंत, महेंद्र लंभाते, विशाल वाणी, गणेश देवकर, प्रकाश कांबळे, मुसला शिंदे, प्रतीक उगले, महेंद्र बोकड, निलेश गायकवाड, सचिन म्हस्के, गणेश बनकर, वैभव सुतार यांच्यासह आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवार आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.