Pune : सेनापती बापट रस्त्यावरील डीएसकेंच्या बंगल्याचा 8 मार्चला लिलाव

एमपीसी न्यूज – गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्या समोरील अडचणीत नव्याने भर पडली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून घेतलेले कर्ज परत न केल्यामुळे त्यांच्या सेनापती बापट रस्त्यावरील बंगल्याचा लिलाव करण्यात येणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.  
 

पुणे शहरातील सेनापती बापट रस्त्यावरील चतुःश्रृंगी टेकडीला लागून हा बंगला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने यासंबंधीची जाहिरात एका वृत्तपत्रात दिली आहे. डीएसके राहत असलेल्या या बंगल्याचा लिलाव येत्या 8 मार्चला होणार आहे. या बंगल्याची किंमत 66 कोटी 39 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 
 
अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णीं यांना काल पुन्हा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातून ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते. ससून रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील 48 तास ससून रुग्णालयातच ठेवण्याचा निर्णय झाला होता. पंरतू डीएसकेंच्या वकीलांनी न्यायालयात केलेल्या अपिलांनतर त्यांना पुढील 48 तास दिनानाथ रुग्णालयात उपचार घेण्यास मुभा दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.