Aundh : औंधमध्ये व्यवसायिकाच्या घरी मोठी चोरी; तब्बल 66 लाखांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज : औंध परिसरात एका व्यावसायिकाच्या घरात (Aundh) मोठी घरफोडी झाली असून सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण 38.5 लाख रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. व्यावसायिक हे खत निर्मिती क्षेत्रात कार्यरत असून त्यांचे सांगली येथे खत निर्मिती केंद्र आहे. तर सध्या त्यांचा मुलगा हा व्यवसाय सांभाळत आहे.

महिला व्यवसायिकेने या प्रकरणी तातडीने चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. औंध येथील स्पायसर शाळेच्या शेजारी त्यांचे निवासस्थान आजे.

सविस्तर माहिती अशी, की चोरांनी व्यवसायिकेच्या बेडरूममधील कपाटातून रोख रक्कम आणि दागिने चोरले.  अंदाजे 27.5 लाखांचे दागिने आणि 38.5 लाखांची रोख रक्कम चोरण्यात आली आहे.

Chinchwad : चिंचवडमध्ये मंगळवारी दिव्यांग कल्याण दिव्यांगाच्या दारी कार्यक्रम

घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी रवाना (Aundh) झाले. सध्या सुरू असलेल्या तपासात  पोलिस अधिकाऱ्यांनी निवासस्थानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधले फुटेज घेतले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.