Maval : फसवणूक आणि खंडणी प्रकरणी बाबाराजे देशमुख याला अटक

एमपीसी न्यूज – वनीकरणात गेलेल्या जमिनीचे प्लॉटिंग करून त्यातील काही प्लॉट एका व्यक्तीस विकले. त्यापोटी 25 लाख रुपये घेतले. त्यानंतर त्याचे खरेदीखत करून न देता 70 लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी शिरगाव परंदवडी पोलिसांनी बाबाराजे देशमुख याला अटक केली आहे.

ही घटना सन 2013 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीत मावळ (Maval) तालुक्यातील बेबडओव्हळ येथे घडली.

Maharashtra Police : 55 वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये

रवींद्र शिवाजीराव देशमुख (वय 48, रा. वडगाव बुद्रुक) यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 17) फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख (वय 33, रा. बेबडओव्हळ , ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबाराजे देशमुख याची बेबडओव्हळ (Maval) येथे असलेली पाच एकर जमीन वनीकरण विभागात समाविष्ट आहे. त्या मिळकतीचे प्लॉटिंग होत नसतानाही देशमुख याने 25 गुंठे जागेचा फिर्यादीशी व्यवहार केला.

त्याचा मोबदला म्हणून 25 लाख रुपये फिर्यादीकडून घेतले. त्या जागेचे फिर्यादीच्या नावे खरेदीखत करून दिले नाही. तसेच फिर्यादीचे 25 लाख रुपये परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली.

खरेदीखत करायचे असल्यास आणखी 70 लाख रुपये खंडणीची फिर्यादीकडे मागणी केली. पैसे न दिल्यास तसेच पोलिसात तक्रार केल्यास फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देऊन पाच लाख रुपये रक्कम खंडणी म्हणून घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव परंदवडी (Maval)  पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.