Bal Sanskar Kendra : श्री गजानन बाल संस्कार केंद्राची घोराडेश्वर डोंगरावर सहल

एमपीसी न्यूज – लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा..(Bal Sanskar Kendra) या म्हणीप्रमाणे नेवाळे वस्ती चिखली येथे श्री गजानन बाल संस्कार केंद्र प्रत्येक रविवारला घेण्यात येते. बालदिनानिमित्त केंद्राच्या वतीने घोराडेश्वर येथे बालकांची सहल काढण्यात आली.

सकाळी 6:30 ला नेवाळे वस्ती येथून घोराडेश्वरला निघाले. 7 वाजता डोंगर चढण्यास सुरुवात झाली. सहलीमध्ये 4 वर्षाच्या बालकांपासून ते 12 वर्षाचे बालक होते. सर्वजण प्रथमच डोंगर चढत होते. त्यामुळे डोंगर चढताना सर्वांना खूपच मजा आली. वरती पोहचल्यानंतर सर्वांनी व्यायाम केला. तसेच खेळसुद्धा झाले. नंतर पद्य म्हटले, नंतर सर्वांनी घरून आणलेला नाश्ता (Bal Sanskar Kendra) केला. या साहलीमुळे मुलांमध्ये गड-किल्ले बघण्याची ओढ निर्माण झाली.

PMPML : ‘पीएमपीएमएल’ ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला 2 कोटींचा टप्पा 

बाल वयात अशा प्रकारचे छंद निर्माण होणे खूप महत्वाचे आहे. या सहलीचे आयोजन मंगेश पाटील यांनी केले होते. या सहलीमध्ये त्यांना श्रीकृष्ण काशीद, चिरतन कुलकर्णी, पंकज दलाल, गुरुराज कुंभार, प्रशांत सिंग, विक्रांत मोजे यांनी मोलाची साथ दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.