Chandrashekhar Bawankule : प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कर्तृत्व हेरून पक्षात योग्य संधी-चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज – प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कर्तृत्व हेरून पक्षात योग्य संधी दिली जाते आणि कार्यकर्तेही ती सार्थ ठरवतात, याचा अभिमान वाटतो असे मत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. (Chandrashekhar Bawankule) पुणे शहर भाजपच्या वतीने बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बावनकुळे बोलत होते.

बावनकुळे पुढे म्हणाले, कार्यकर्ता हा पक्षाची खरी ताकद आहे. भाजपाच्या कक्षा देशभरात विस्तारण्यात पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याचा मोठा वाटा आहे.

PCMC News : अतिक्रमणाची कारवाई करताना राजकीय दबाव येतो का? विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आयुक्त म्हणाले…

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरीताई मिसाळ, भिमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, सुधाकर भालेराव, दिलीप कांबळे, बापुसाहेब पठारे, (Chandrashekhar Bawankule) संघटनमंत्री मकरंद देशपांडे, रवी अनासपुरे, प्रसनजित फडणविस, प्रभारी धीरज घाटे, गणेश बिडकर, वर्षा तापकीर,संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, संदीप लोणकर, बापू मानकर,सुशील मेंगडे, योगेश मुळीक, अनिल टिंगरे, अनुप मोरे, संतोष खांदवे, पुनित जोशी, सचीन मोरे, महेश पुंडे, जितेंद्र पोळेकर, प्रमोद कोंढरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.