Pune news : गोवरची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

एमपीसी न्यूज : गोवर विषाणूपासून होणारा आजार आहे. गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याद्वारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो.(Pune news) या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.

Chandrashekhar Bawankule : प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कर्तृत्व हेरून पक्षात योग्य संधी-चंद्रशेखर बावनकुळे

मागील काही दिवसांपासून मुंबईत गोवर आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे.  मुंबईत 900 जण संशयित बालके आढळली आहेत तर आतापर्यंत सात संशयितांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. त्याअनुशंगाने आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, ही गोवर या आजाराची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात.(Pune news) दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.