Pimpri : जिनवानी पुत्र क्षुल्लकजी श्री 105 ध्यानसागर जी महाराज यांच्या वाणीतून अनुभवता येणार श्री रामकथा

एमपीसी न्यूज : सकल जैन समाजाच्या वतीने सर्व (Pimpri) जातीधर्माच्या भाविकांसाठी 10 दिवस श्रीराम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही रामकथा प्रमुख जैन आचार्य 108 श्री विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य जिनवानी पुत्र क्षुल्लकजी श्री 105 ध्यानसागर जी महाराज यांच्या सुमधुर आवाजात पुणे- पिंपरी -चिंचवड शहरातील भाविकांना अनुभवता येणार आहे.

जैन बांधवांनी सर्व जातीधर्मासाठी श्री रामकथेचे आयोजन करणे हे शहरात प्रथमच घडत आहे. दि.19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान दहा दिवस हा कार्यक्रम कल्याण प्रतिष्ठान (सुखी भवन), केशवनगर, काळेवाडी रोड, चाफेकर चौकाजवळ चिंचवड येथे संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत (Pimpri) होणार आहे.

प. पु. ध्यानसागरजी महाराजांचा संपूर्ण देशभरात पायी विहार होत असून चिंचवड येथे त्यांचे 11 तारखेला आगमन झाले. जैन समाजाच्या वतीने त्यांची मिरवणूक काढून आनंदात स्वागत केले.

Pune news : गोवरची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

प. पु. ध्यानसागरजी जिनवानी हे गाढे अभ्यासक असून त्यांचे रामायण कथेंवर प्रभुत्व आहे. त्यांच्या विशेष शैलीत रामायणातील विविध प्रसंगांचे साग्रसंगीत वर्णन ऐकत असताना भाविक भान हरवून तल्लीन होतात. पुढील कथा ऐकण्यास आतुर असतात.

या पत्रकार परिषदेस आयोजन समिती व पारस भवन ट्रस्टचे कार्याध्यक्ष विनय चुडीवाल, अध्यक्ष मनीष बडजात्या, सीए पंकज पाटनी, देवेन्द्र बाकलीवाल, शीतल पहाड़े, भूपाली पहाड़े, जैन महासंघाचे डॉ. अशोककुमार पगारिया, सुरेश गादीया, अजित पाटील, वीरेंद्र जैन, सुदिन खोत व समाजाचे प्रतिष्ठित सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.