Pimpri News : मुळा नदीच्या पुनरूज्जीवनासाठीही महापालिका कर्जरोखे उभारणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना व इंद्रायणी नदीपाठोपठ आता मुळा नदीच्या शहरातील 14.20 किलोमीटर लांबीच्या पुनरूज्जीवनासाठीही (Pimpri news) महापालिका कर्जरोखे उभारणार आहे. 321 कोटीच्या या कामासाठी प्रत्येक वर्षी होणार्‍या खर्चाच्या प्रमाणात म्युनिसिपल बाँडच्या माध्यमातून निधी उभारण्यात येणार आहे. हे कर्जरोखे उभारण्यासाठी यापूर्वी नेमणूक केलेल्या मध्यस्थ संस्थांमार्फत कामकाज करण्यात येणार आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातून पवना, इंद्रायणी व मुळा या नद्या वाहतात. पवना व इंद्रायणीचे पुनरूज्जीवन करण्यात येणार आहे. त्यासाठी 200 कोटींचे कर्जरोखे उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे यापूर्वी पाठविण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवड आणि पुणे महापालिका हद्दीतून मुळा, मुठा व मुळा-मुठा या नद्या वाहतात. दोन्ही महापालिका हद्दीत या नदीची एकूण लांबी 44.40  किलोमीटर इतकी आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीलगत मुळा नदीच्या काठाची लांबी 14.20 किलोमीटर आहे. त्यामध्ये पिंपळेनिलख येथील डिफेन्स लॅड, दापोडीतील सीएमईचा अंतर्भाव आहे. या पूर्ण लांबीचा अंदाजयपत्रकीय खर्च 750 कोटी येत आहे. या पूर्ण नदीचा अधिकांश भाग हा पुणे महापालिका हद्दीत येत असल्याने या पूर्ण नदीचे पुनरूज्जीवन प्रकल्पाचे काम पुणे महापालिकेसोबत संयुक्तरित्या राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

Pimpri : जिनवानी पुत्र क्षुल्लकजी श्री 105 ध्यानसागर जी महाराज यांच्या वाणीतून अनुभवता येणार श्री रामकथा

पिंपरी-चिंचवड हद्दीतील वाकड बायपास ते सांगवी पूल या सुमारे 8.80 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यातील 321 कोटी रुपयांच्या कामाची (जीएसटी वगळून) निविदा संयुक्तरित्या काढण्यात येणार आहे. ही निविदा पुणे पालिकेच्या मंजूर दरसूचीनुसार काढण्यात येत आहे.(Pimpri news) निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यास 4 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यासाठी 1 नोव्हेंबर 2022 रोजी बैठक झाली. पवना, इंद्रायणी नदीच्या धर्तीवर मुळा नदीसाठीही महापालिकेने कर्जरोखे काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मुळा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी 750 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यात प्रसिद्ध करण्यात  येणा-या कामाची निविदा पुणे महापालिकेमार्फत संयुक्तरित्या काढण्यात येत आहे. त्यानुसार या कामाच्या आवश्यक खर्चासाठी प्रत्येक वर्षी होणा-या खर्चाच्या प्रमाणात (Pimpri news) म्यूनिसिपल बॉडच्या माध्यमातून निधी उभारण्याचे प्रस्तावित आहे. पवना, इंद्रायणीनदीच्या धर्तीवर मुळा नदी प्रकल्पासाठी महापालिका कर्जरोखे उभारणार आहे. कर्जरोखे उभारण्याच्या कामकाज पूर्वीच्याच संस्थेमार्फत केले जाणार आहे. त्यासाठी येणा-या प्रत्यक्ष खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.