PCMC News : स्वच्छतेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षण 2023 या (PCMC News) स्पर्धेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सहभाग घेतला असून त्याअनुषंगाने ऑक्टोबर 2022 या महिन्यात क्षेत्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यामध्ये ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे यांनी प्रथम, ‘इ’ क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांनी द्वितीय तर ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उल्हास जगताप, महापालिकेचे सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ सर्वेक्षण 2023 या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराला देशात सर्वप्रथम आणण्यासाठी महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व विभाग यांच्या कामकाजाचे स्वरुप व जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

Pimpri : जिनवानी पुत्र क्षुल्लकजी श्री 105 ध्यानसागर जी महाराज यांच्या वाणीतून अनुभवता येणार श्री रामकथा
त्याअनुषंगाने महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने त्यांनी (PCMC News) केलेल्या कामकाजाचे काही निकषांच्या आधारावर गुणांकन देण्यात आले होते. यामध्ये वर्गीकृत कचरा संकलन – कचऱ्याचे वर्गीकरण आणि संकलन करणे, सार्वजनिक क्षेत्रातील साफसफाई करणे, सिंगल युज प्लास्टिकचा कमी वापर किंवा बंदी, महापालिकेच्या सफाई कामगारांना लाभ देणे, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान प्रत्येक महिन्याला किमान एक शून्य कचरा कार्यक्रम राबविणे, नॉन बल्क जनरेटर्सद्वारे साईटवर  ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे तसेच बल्क जनरेटर्सद्वारे साईटवर ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे अशा निकषांच्या आधारावर त्यांचे मुल्यांकन करण्यात आल्याबाबतची माहिती स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.