PCMC : पालिकेच्या उपलेखापालाला पाचशे रुपयांचा दंड

एमपीसी न्यूज – पात्र ठेकेदाराचे नाव चुकविल्याने स्थायी समिती सभेत पुन्हा नावाची (PCMC )दुरुस्ती करून नुकतीच प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र कामकाजात हलगर्जीपणा करत नावात चूक केल्याने महापालिकेचे उपलेखापाल महेश निगडे यांना पाचशे रुपये दंड करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडील स्थापत्य प्रकल्प विभागाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केली.

महापालिकेचे उपलेखापाल निगडे यांच्याकडे स्थापत्य प्रकल्प विभागाचा(PCMC )अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. मोशी येथील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या गायरान जागेत 700 बेडचे सुसज्ज रुग्णालय बांधण्यात येत आहे.

Marunji:गेट खोलून आत घेतले नाही म्हणून सुरक्षा रक्षकाला केली बेदम मारहाण

 

या जागेस सीमा भिंत बांधणे आणि त्या अनुषंगाने कामे करण्यासाठी सिद्धनाथ कॉर्पोरेशन या ठेकेदाराची लघुत्तम निविदा प्राप्त झाल्याने त्या ठेकेदारास काम मंजूर करण्यात आले. मात्र, स्थायी समितीच्या प्रस्तावात संबंधित ठेकेदाराचे नाव ‘सिद्धनाथ कॉर्पोरेशन’ ऐवजी ‘सिद्धनाथ कन्स्ट्रक्शन’ असे झाले होते. त्यानंतर केवळ नाव दुरुस्त करून पुन्हा स्थायी समितीची मान्यता घेण्यात आली. त्यामुळे उपलेखापालांना पाचशे रूपये दंड करण्यात आला.

उपलेखापाल निगडे यांनी कामकाजात निष्काळजीपणा केल्याने यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना केलेला पाचशे रुपये दंड नजीकच्या वेतनातून वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, स्थापत्य प्रकल्प विभागाची जबाबदारी काढून घेत त्यांच्याकडे पूर्णवेळ वैद्यकीय विभागात धन्वंतरी कक्षाचे कामकाज सोपविण्यात आले आहे.

 

 

https://www.youtube.com/watch?v=NFtTw2DPu6I&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.