Kondhawa Traffic Update: कोंढवा परिसरात जड वाहनांना बंदी

एमपीसी न्यूज – कोंढवा परिसरातील काही मार्गावर मंगळवार (दि.8) पासून जड वाहनांना बंदी (Ban on heavy vehicles in Kondhwa area) घालण्यात आली आहे, अशी माहिती कोंढवा वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त राहूल श्रीरामे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. वाहतूक विभागाला प्राप्त झालेल्या सुचना व हरकतीनुसार हा बदल करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे.

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील मार्गात हे बदल करण्य़ात आले आहेत.

1) उंड्री चौक ते कडनगर चौक तसेच ज्योती हॉटेल ते पारगेनगर क्रॉसिंग – या दोन मार्गावर सकाळी सहा ते दुपारी 12 पर्यंत तसेच सायंकाळी चार पासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत या मार्गावर जड वाहनांना बंदी करण्यात आली असून दुपारी बारा ते सायंकाळी चार पर्यंत जड वाहनांना हे मार्ग खुले राहणार आहेत.

Massive explosion in the reactor: पुण्याजवळील कुरकुंभ एमआयडीसीत रिऍक्टरचा भीषण स्फोट, तीन कामगार गंभीर जखमी

2) एन.आय.बी.एम रोड ते घुले पाटील चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर, संघरिया सोसायटी, बिशप स्कुल पासून एन.आय.बी.एम रोडकडे जाणऱ्या मार्गावर याबरबरच इशरत बाग. ऑर्चिड पॅलेस सोसायटी जवळील मार्गावरून एन.आय.बी.एम रोडकडे जाणाऱ्या मार्गावर 24 तास जड वाहनांना वाहतुक बंदी करण्यात आली आहे. याचाच अर्थ या तीनही मार्गावर यापुढे जड वाहनांना प्रवेश मिळणार नाही.

वरील बदलांबाबत नागरिकांच्या काही सुचना किंवा हरकती असतील तर त्या मंगळवार (दि.8) ते 22 नोव्हेंबर या 14 दिवसांच्या कालावधीत लेखी स्वरुपात पोलीस उपायुक्त वाहतुक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफीस,बंगला नं 6 जेल रोड पुणे यांच्या कार्यलयात द्याव्यात. नागरिकांच्या सुचना व हरकतीनुसार पुढे ही योग्य ते बदल करण्यात येतील. नागरिकांनी या बदलाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त राहूल श्रीरामे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.