Massive explosion in the reactor: पुण्याजवळील कुरकुंभ एमआयडीसीत रिऍक्टरचा भीषण स्फोट, तीन कामगार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज: पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील शोगन ऑरगॅनिक लिमिटेड (Shogun Organic Limited) या कंपनीतील रिऍक्टरमध्ये भीषण स्फोट (Massive explosion in the reactor) झाला. या स्फोटात कंपनीतील तीन कामगार गंभीर जखमी (Three workers injured) झाले आहेत. हा स्फोट इतका भयानक होता की कंपनीला लावण्यात आलेले पत्र्याचे तुकडे होऊन ते पुणे सोलापूर महामार्गावर येऊन पडले होते. यामध्ये तीन कामगारही होरपळले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कुरकुंभ एमआयडीसीत (Kurkumbh midc) असलेल्या शोगन ऑरगॅनिक लिमिटेड या कंपनीत रासायनिक प्रक्रिया करण्याचे काम केले जाते. ही प्रक्रिया सुरू असतानाच रिॲक्टरमध्ये निर्माण झालेल्या दाबामुळे मोठा स्फोट झाला. यावेळी कंपनीत असणारे तीन कामगार होरपळले आहेत.

कुरकुंभ एमआयडीसीत (Kurkumbh midc) केमिकल कंपन्या मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या भागात वारंवार अशा प्रकारच्या घटना होत असतात. यामध्ये अनेकांना यापूर्वी आपले प्राणदेखील गमवावे लागले आहेत. वारंवार अशा घटना होत असल्यामुळे आजूबाजूंच्या गावांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.