Accident News: तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परत येताना अपघात; पुण्यातील दोन महिलांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परत येत असताना झालेल्या भीषण अपघातात (Accident while returning from tirupati balaji) पुण्याच्या धानोरी परिसरातील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातादरम्यान भरधाव वाहनातून बाहेर फेकल्या गेल्याने त्या दोघींचा मृत्यू झाला. मानसी सचिन शेजुळ (वय 43) आणि उज्वला सचिन बर्वे (वय 48) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे आहेत. अपघातात सचिन बर्वे (वय 50) हे गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, धानोरी परिसरातील एका सोसायटीत राहणारे दोन कुटुंब तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना सोमवारी रात्री कर्नाटक मधील दावणगिरी गावाजवळ त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीला अपघात झाला. गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी दोन ते तीन वेळा पलटी झाली. यादरम्यान गाडीतील महिला बाहेर फेकल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तर मृत्युमुखी पडलेल्या दोन्हीही महिलांचे मृतदेह विश्वविच्छेदन करून पुण्याकडे पाठवण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.