Nirmala Sitharaman Baramati Visit : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन पुन्हा बारामती दौऱ्यावर

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्षाने यावर्षी काहीही करून बारामती लोकसभा मतदारसंघावर विजय मिळवायचा असा पण केला आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी या मतदारसंघात आतापासूनच दौरे सुरू केले आहे. यापूर्वी बारामती मतदारसंघात भेट देऊन गेलेल्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन पुन्हा एकदा बारामती दौऱ्यावर (Nirmala Sitharaman Baramati Visit)येणार आहेत. त्यामुळे भाजपच्या मिशन बारामतीच्या हालचालींना आता वेग आला आहे.

Earthquake in Nepal : नेपाळमध्ये झालेल्या 6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर दिल्ली व आसपासच्या भागात जोरदार हादरे

सप्टेंबर महिन्यात निर्मला सीतारामन बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा त्या पुन्हा एकदा बारामतीचा दौरा करणार आहे. यावेळी निर्मला सीतारामन यांचा दौरा निश्चित करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल बारामतीत मुक्कामी येणार आहेत अशी माहिती अविनाश मोटे यांनी दिली. अविनाश मोठे हे भाजपचे लोकसभा प्रमुख आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्मला सीतारामन बारामतीचा दौरा करण्याची शक्यता आहे.

या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी बारामतीत येणार आहेत. 11 नोव्हेंबर रोजी ते भोर पुरंदर जेजुरी खडकवासला या भागात दौरा करतील. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते राम शिंदे, गणेश भेगडे आदी उपस्थित असतील. तर 12 नोव्हेंबर रोजी ते इंदापूर भिगवण दौंड या तालुक्यांना भेटी देणार आहेत. त्यानंतर ते पुण्यातील कौन्सिल हॉल या ठिकाणी पत्रकाराची संवाद साधतील अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.