Pune : कुरकुंभ एमआयडीसीतून पुणे पोलिसांनी छापा मारून 1100 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज केले जप्त

एमपीसी न्यूज – पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी येथील एका ( Pune ) कारखान्यावर पुणे पोलिसांचा छापा मारून 1100 कोटी रुपयांचे 600 किलो पेक्षा अधिकचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अनेक जण ताब्यात घेतले असून आजवरच्या इतिहासात पुणे पोलिसांची सगळ्यात मोठी कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे. अनिल साबळे नामक कारखाना मालकाला पोलिसांनी डोंबिवली इथून सकाळी ताब्यात घेतले आहे. कुरकुंभ एमआयडीसी मध्ये यापूर्वी देखील अनेकवेळा अश्या धाडी टाकण्यात आल्या असून अजून यामध्ये किती कंपन्या अश्या प्रकारे बेकायदेशीर ड्रग्ज बनवण्याचे काम करीत आहेत. हे पाहणे गरजेचे झाले आहे.

Thergaon: विवाहितेचा छळ करून तिचा मृत्यू प्रकरणी पतीला अटक

शहरासह देशभरातील विविध शहरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांची छापेमारी सुरू आहे. कुरकुंभ येथील कारखाना मालक व केमिकल एक्स्पर्ट पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आतापर्यंत तीन कारवायांमध्ये  600 किलोहून अधिक एमडी जप्त करण्यात आले ( Pune ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.