Maratha reservation: मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

एमपीसी न्यूज –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण विधेयक (Maratha reservation) आज विधीमंडळात मांडलं. मुख्यमंत्र्यांनी मांडलेलं मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झालं.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या आरक्षण विधेयकाला आमचा कुणाचाही विरोध नाही, त्यामुळे याला बहुमत म्हणा किंवा एकमत म्हणा, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

Thergaon: विवाहितेचा छळ करून तिचा मृत्यू प्रकरणी पतीला अटक

त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण विधेयक हे बहुमताऐवजी एकमताने मंजूर होत आहे, असं सांगितलं.ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण आम्ही देत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

राज्य सरकारने आज मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावलं. यामध्ये मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानंतर सादर केलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला. त्याला मंत्रिमंडळ मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मांडलं.

 

मराठा आरक्षण कोर्टात टिकणारच
मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात टिकणारच. राज्य सरकारने घेतलेला निर्णय मोठा आणि धाडसी निर्णय आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.