Bhosari: मास्टर माईंड ग्लोबल स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे शिवजयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज –  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Bhosari)यांची सोमवारी (दि.19) जयंती एम.एम जी.एस येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी  विद्यालयात शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे मुख्याध्यापिका डॉ. प्रदिपा नायर यांच्या हस्ते पूजन करून शिवगर्जना करत भव्य रॅली काढण्यात आली. 
विद्यालयापासून ते पीसीएमसी चौक भोसरी येथील (Bhosari)शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत  मशाल घेऊन ,ढोल पथकाच्या गजरात,लेझीम खेळत, ही रॅली काढण्यात आली होती.

स्मारकासमोर विद्यार्थ्यांनी नृत्य, लाठीकाठी कला सादर करून शिवगर्जना सहित शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसमवेत सर्व शिक्षकांनी पारंपारिक पद्धतीने भगवे फेटे परिधान करून हातात भगवे ध्वज घेऊन शिवाजी महाराजांचा जयघोष करीत रॅलीत सहभाग घेतला होता तसेच लव्या ट्रान्सपोर्ट च्या सर्व कार्यकर्त्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला .

विद्यालयामध्ये शिवजयंतीनिमित्त किल्याच्या प्रतिकृती चे प्रदर्शन भरवण्यात आले होते त्यामध्ये पालकांनी सहभाग नोंदवला .तसेच जवळपास 800  विद्यार्थ्यांनी मिळुन शिवाजी महाराजांची भव्य चित्र प्रतिकृती बनवून एक नविन उपक्रम राबवण्यात आला. अशाप्रकारे शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.प्रदीपा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजयंती सोहळा पार पडला. यावेळी पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण , आणि टीम, बोरकर  यांनी मोलाचे सहकार्य केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.