Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ महिलेवर भटक्या कुत्र्याचा हल्ला

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील कडोलकर कॉलनीमधील ( Talegaon Dabhade)  रस्त्यावर काल  (सोमवारी) सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका ज्येष्ठ महिलेस भटक्या श्वानाने चावा घेत गंभीर जखमी केले.
चेहऱ्यावर, हातावर श्वानाने खोलवर चावा घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या सदर जेष्ठ महिलेस खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  गेल्या काही महिन्यांपासून परिसरात भटक्या श्वानांची दहशत वाढली आहे. त्यातूनच सोमवारी सकाळी फिरायला गेलेल्या एका ज्येष्ठ महिलेवर एका भटक्या श्वानाने हल्ला केला.

श्वानाने हल्ला केल्याचे निदर्शनास आल्यानंतर तेथे उपस्थित असलेले लायन्स क्लबचे व्यवस्थापक दत्तात्रेय भिसे यांनी आरडाओरड केल्यानंतर, जवळच मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या दोन युवकांनी त्वरित धाव घेत महिलेस श्वानाच्या तावडीतून सोडविले.
या घटनेनंतर नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.  श्वानाला जेरबंद केले असले तरी यावर ठोस उपाय नगरपरिषद करणार का, असा सवाल उपस्थित ( Talegaon Dabhade) केला जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.