Pune News : वढू येथे मास्क उत्पादन करणाऱ्या कंपनीला भीषण आग

एमपीसी न्यूज कोरेगाव भिमा येथील वढु बुद्रुक मध्ये एम फिल्टर मास्क तयार कऱणारी कंपनी आहे. या कंपनीला आज (शनिवारी) दुपारी भिषण आग लागली आहे.(Pune News) या आगीत दहा ते बारा सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळी नगर रस्ता, भीमा कोरेगांव, वडू या ठिकाणाहून अग्निशमन दलाची (पीएमआरडीए चार, एमआयडिसी 1, पीएमसी 1) सहा अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार या आगीत तीन कामगार हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

Chikhali News : चिखलीतील गुंजकर हॉस्पिटल म्हणजे रुग्णांचा आधारवड

नगर रस्ता,भीमा कोरेगांव- वढू रोड या ठिकाणी एआयएम फिल्टर कंपनीला दुपारी 12 च्या सुमारास आग लागलेली होती पीएमआरडीए अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन आधिकरी श्री. देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र अधिकारी विजय महाजन यांनी आग लागलेल्या ठिकाणी अग्निशमन वाहने पीएमआरडीए 05, एमआयडीसी रांजणगाव 01, पीएमसी 1, आळंदी नगर परिषद 01, शिरूर नगर परिषद 01, वाहने दाखल झाली. आग विझवण्याचे कार्य सुरू करण्यात आले.

कंपनीचे शेड हे अंदाजे. 01 एकर एरिया मध्ये होते, फिल्टर व वाहनांच्या इंटेरियर साठी लागणारे कुशन, कापड बनवण्याचे काम कंपनी करीत होती, कंपनी मधे जवळपास 47.05 किलो ग्राम वजनाचे 50 LPG सिलेंडर व 19 किलोग्राम वजनाचे चे 04 सिलेंडर  याठिकाणी होते.(Pune News) त्या मधील 08 सिलेंडरचा स्पोट झाला. त्या मुळे आगीने रैाद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांनानंतर 50 अग्निशमन जवानांच्या मदतीने 05 तासाच्या अवधी नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.