Alandi News : जगात काहीतरी करायचे असेल तर कला आणि प्रज्ञा या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते:- सुरेश गोयल

एमपीसी न्यूज : श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी येथे विज्ञान व संगणकाचे प्रदर्शन ‘मैत्री संगणकाशी नाते विज्ञानाशी’ हा कार्यक्रम (Alandi News) आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुरेश गोयल (प्रसिद्ध टॅक्स कन्सल्टर पिंपरी-चिंचवड) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेले संगणक व विज्ञान विषयाचे 190 प्रकल्प तसेच विविध प्रकारच्या रांगोळ्यांचे रेखाटन करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध विषयावर आधारित पंधरा व्हिडिओ क्लिप तयार केल्या.

संगणक प्रदर्शनामध्ये व्हर्च्युअल म्युझियम आणि सेल्फी पॉइंट हे आकर्षणाचे बिंदू ठरले. कोरोना काळात संपूर्ण जग थांबले असताना केवळ तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सर्व गोष्टी शक्य झाल्या असे मत कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले निलेश बोरचटे (संचालक कुलस्वामिनी पतसंस्था आळंदी देवाची) यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना सुचणाऱ्या कल्पनांचे स्रोत प्रत्यक्ष माऊलीच आहेत त्याच बरोबर जगात काहीतरी करायचे असेल तर कला आणि प्रज्ञा या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते आणि ही गोष्ट आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये दिसत असल्याचे सुरेश गोयल यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

Pune News : वढू येथे मास्क उत्पादन करणाऱ्या कंपनीला भीषण आग

कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्कृताचार्य ह.भ.प. गोरक्ष महाराज उदागे यांनी आयुष्यात पुढे जाण्यासाठी शालेय शिक्षणच उपयोगी पडते, अन्न ,वस्त्र, निवारा याबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे संगणक ज्ञान दोन्ही गोष्टी अत्यावश्यक आहेत. वैज्ञानिकांचे विचार आत्मसात करणे, संगणकाचे ज्ञान मिळवणे, त्याचा वापर योग्य कारणासाठीच केला जावा असे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना केले.  संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी विविध उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक डी.एम. मुंगसे यांनी विज्ञान, संगणक  व अध्यात्म यांची सांगड घालत त्याचे महत्त्व विषद केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा खेसे यांनी केले तर प्रास्ताविक संजय उदमले यांनी केले.  कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे आभार शिक्षक प्रतिनिधी नारायण पिंगळे यांनी व्यक्त केले.(Alandi News) कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान विभाग प्रमुख  अनिता गावडे व संगणक विभाग प्रमुख सोमनाथ आल्हाट व कदम मॅडम यांनी केले. तसेच विज्ञान आणि संगणक विभागातील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.