Pune News : कुरीअर पँकींग मधून अंमली पदार्थांची विक्री करणारे दोघे अटकेत

एमपीसी न्यूज  – कुरीअर पँकींग द्वारे गांजा व चरस या अंमली पदार्थांची विक्री कऱणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी पुणे बँगलोर परिसरातून अटक केली आहे. (Pune News) ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक एक यांनी केली असून यां कारवाईमध्ये पोलिसांनी 3 किलो 681 ग्रॅंम गांजा व 14 ग्रॅंम चरच जप्त केले आहे.

हर्षद दत्तात्रय इंगळे (वय 21 रा. दापोडी) व भागवत शेषनारायण सुरनर (वय 20 रा.बावधन) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Alandi News : जगात काहीतरी करायचे असेल तर कला आणि प्रज्ञा या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते:- सुरेश गोयल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासी पथक ऑनलाईन पद्धतीने अंमली पदार्थ विक्री कऱणाऱ्यांचा शोध घेत असताना पोलिसांना बातमीदारामार्फत खबर मिळाली की, पुणे-बँगलोर महामार्गावर दोन इसम दुचाकीवरून येवून अंमली पदार्थ विक्री करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीनां ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकी, 3 किलो 681 ग्रॅंम गांजा व 14 ग्रॅंम चरस, रोख रुपये 4 हजार , मोबाईल व 3 हजार रुपयांचे इतर साहित्य असा (Pune News) एकूण 3 लाख 17 हजार 620 रुपयांचा ऐवज जप्त केला.आरोपी विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.