Sangavi News : शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांतदादांकडून खबरदारी; फेसशिल्ड घालून कार्यक्रमाला उपस्थित

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असलेले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आज (शनिवारी) पुन्हा शाईफेक करण्याची धमकी दिली होती. (Sangavi News) त्यामुळे अधिकची खबरदारी घेत पालकमंत्री पाटील यांनी फेसशिल्ड घालून सांगवी येथील पवनाथडी जत्रेला भेट दिली.

गेल्या आठवड्यात शनिवारी पालकमंत्री पाटील चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शहरात आले होते. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे समता सैनिक दल कार्यकर्त्याने पालकमंत्री पाटील यांच्या तोंडावर शाईफेकली होती. हे प्रकरण चांगलेच तापले होते.

MVA Mahamorcha : महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा; राज्यपालांची हकालपट्टी करा अन्यथा…शरद पवार कडाडले

महापालिकेच्या वतीने महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी.मैदानावर 16 ते 20 डिसेंबर 2022 या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेला भेट देण्यासाठी पालकमंत्री पाटील आज (शनिवारी) शहरात आले आहेत. त्यापूर्वी त्यांना धमकी वजा इशारा देण्यात आला होता. आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार? मु.पो.सांगवी , पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या, असा धमकी वजा इशारा दिला होता. याबाबत भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धमकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुरेशी खबरदारी घेतली.अतिरिक्त खबरदारी घेत ते पवनाथडी जत्रेच्या ठिकाणी आले. (Sangavi News) सुरक्षिततेसाठी पालकमंत्री पाटील यांनी फेस मास्कचा वापर केला होता. यावेळी आमदार उमा खापरे, माजी महापौर उषा ढोरे, महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पवना थडी जत्रेचं उद्घाटनाच्या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सांघवीच्या साई चौकापासून तर कृष्णा चौकापर्यंत पोलिसांच्या ताफा तैनात करण्यात आला होता. पवनाथडी जत्रेत अनेक लहान मोठे स्टॉल्स असतात. या प्रत्येक स्टॉल्स समोर एक पोलीस तैनात करण्यात आले आहे.  यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक बंदोबस्त तैनात ठेवला आहे. शिवाय मागील काही दिवसांपासून त्यांच्या सुरक्षेतदेखील वाढ करण्यात आली आहे. फेस शिल्ड लावून त्यांनी प्रत्येक स्टॉलची पाहणी केली. उद्घाटनाच्या वेळी अनेक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.