Chikhali News : चिखलीतील गुंजकर हॉस्पिटल म्हणजे रुग्णांचा आधारवड

एमपीसी न्यूज – एकाच छताखाली रुग्णांचे सर्व उपचार व इतर सोयी सुविधा, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला. रुग्ण पूर्ण बरा होण्याची खात्री म्हणजे पिंपरी-चिंचवड मधील चिखली (Chikhali News) येथील गुंजकर हॉस्पिटल हे एकमेव नाव. त्यामुळे परिसरात रुग्णांचा आधारवड म्हणून देखील गुंजकर हॉस्पिटलची ख्याती आहे.

गुंजकर हॉस्पिटलचे काम पूर्ववत नसताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कोविड रुग्णांचे गांभिर्य लक्षात घेऊन हॉस्पिटलला रुग्ण सेवेचे आदेश दिले. त्यानुसार डॉ.जयकुमार गुंजकर यांनी क्षणाचाही विलंब न करता हॉस्पिटल आहे, त्या परिस्थितीत रुग्ण सेवा देण्याचे धैर्य दाखवले आणि कोविड रुग्णांसाठी हॉस्पिटलचे दार उघडले.

खरे तर ओपनींग म्हंटले, तर मोठा सोहळा डोळ्यासमोर उभा राहतो. पण, कोणताही सोहळा समारंभ न करता, त्यांनी रुग्णसेवेचा विडा उचलला आणि कोविड रुग्णांना पुरेपुर सेवा देण्यासाठी तत्पर झाले.

Pune News : कुरीअर पँकींग मधून अंमली पदार्थांची विक्री करणारे दोघे अटकेत

कोविडचा प्रथम रुग्ण 18 जुलै 2020 रोजी घेऊन त्यांनी रुग्णसेवेची मुहूर्तमेढ रोवली. सन 2020 ते 2022 मध्ये जगावर आलेल्या  कोविडच्या संकटातून हजारो रुग्णांवर योग्य आणि वेळेत उपचार करुन रुग्णांचे जीवन वाचवून हजारो संसार वाचवणारे एक देवदूतच ठरले आहेत. त्यांनी कोविडवर विजय मिळवला.

त्यानंतरही त्यांनी आपल्या रुग्णसेवेचा वारसा कायम ठेवत 18 जुलै 2022 रोजी नॉन  कोविड हॉस्पिटलला सुरुवात करून हॉस्पिटल सुरळीत चालू केले.(Chikhali News) आज गुंजकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली 5 मजली भव्य इमारतीच्या दालनात सर्व प्रकारच्या ऑपरेशनची सुविधा देण्यात आली आहे. यातील दोन ऑपरेशन थेअटर्स हे वातानुकुलीत आहेत. हृदयाचे आजार  लक्षात घेऊन 1 भव्य निर्जंतूक कॅथ लॅबची स्थापना केली आहे. तसेच, आजपर्यंत शेकडो पेशंटचे जीव वाचवले आहेत. त्यानंतर 20 बेडचे 9 व्हेंटीलेटर असलेले भव्य अति दक्षता विभाग उभारला आहे. ज्यामध्ये हजारो रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

स्वतः शैक्षणिक न्युरो सर्जन असणाऱ्या डॉ. जयकुमार गुंजकर यांनी जवळजवळ हजारो मेंदुचे यशस्वी ऑपरेशन केले आहेत. ते करत असताना लोकांच्या गरजा लक्षात घेऊन तसेच रुग्णांना एकाच छताखाली योग्य़ आणि परिपूर्ण उपचार मिळावेत, यासाठी हॉस्पिटलमध्ये ‘Hemo dialysis’ युनीटची स्थापना केली. याचाही आत्तापर्यंत हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे. याबरोबरच हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन, एक्स रे, लॅब्रोटरीसारखे तपासणी सेटरही चालू केले. हॉस्पिटलच्या आवारातच औषधांची फार्मसी देखील चालू केली.

एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना थोडा दिलासा मिळाला आहे. कारण त्यांची होणारी धावपळ कमी झाली आहे. याबरोबरच 24 तास ऑपरेशन थिएटर, ओपीडी, कॅथ लॅब, फार्मसी, सीटी स्कॅन, फार्मसी, आयपीडी, डेमो डायग्नोसीस सारख्या सुविधा चालू आहेत.(Chikhali News) तसेच, सर्व प्रकारच्या सरकारी विमा योजानाही येथे लागू करुन दिल्य़ा जातात. त्यामुळे घरात कोणालाही काहीही झाले, तर खात्री व विश्वासाने गुंजकर हॉस्पिटलला भेट द्या, तुम्ही नक्कीच बरे व्हाल!!!

प्लाॅट नंबर 315,सेक्टर 18.
स्पाइन रोड, शिवतेज नगर
पीसीएमसी चिखली पुणे .
 संपर्क:
87885 11314
9767092120

gunjkarhospital [email protected]

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.