Kondhwa Crime News : स्वतःच्या नवीन घरासाठी दुसऱ्याचे घर फोडले

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पाचच्या पथकाने कोंढवा परिसरात (Kondhwa Crime News) झालेल्या घरफोडीचा छडा लावला आहे. आरोपीने त्याच्या नवीन घरासाठी दुसऱ्याचे घर फोडल्याचे तपासात उघड झाले आहे.मल्लप्पा साहेबान्ना होसमानी (वय 31 रा. कात्रज) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलिसांना खबर मिळाली की, एक जण दुचाकीवरून संशयीत रित्या जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने कोंढवा  येथे घरफोडी केल्याचे कबूल केले.

Pune News : पाषाण ते पंचवटी बोगद्याच्या कामाचे सर्वेक्षण पूर्ण

आरोपीने कोंढवा येथून घरातून 37 लाख 30 हजार 200 रुपयांचे 65.5 तोळे वजनाचे हिऱ्याचे व सोन्याचे दागिने चोरल्याचे सांगितले. हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही चोरी करून त्या पैशातून तो दुसरीकडे घर घेऊन राहणार असल्याचे त्याने सांगितले. कोंढवा (Kondhwa Crime News) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.