Kondhava : घरफोडी : रोख रकमेसह सव्वादोन लाखांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – कोंढवा येथे बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना 13 मे ते 1 जूनच्या दरम्यान घडली. याप्रकरणी मौसीन शेख (वय 28, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली.

मौसीन यांचा कोंढव्यातील इब्राहिम इनक्लेव्ह बिल्डिंग टेम्पल टॉवर येथे फ्लॅट आहे. ते 13 मे रोजी आपला फ्लॅटला कुलूप लावून 15 दिवसांसाठी बाहेर गेले होते. या कालावधीत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीद्वारे उघडून घरात प्रवेश केला. त्यांनी कपाटातील रोख 35 हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख 11 हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरी करून नेला. मौसीन 1 जूनला परत आले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले.

मौसीन यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.