Tripurari Paurnima: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगडावर दिव्यांची आरास

एमपीसी न्यूज – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच तसेच, लोहगड घेरेवाडी भाजे व पाटण ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी किल्ले लोहगडावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील मोठ्या उत्साहाने दीपोत्सव साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. वि का सो चेअरमन गणेशभाऊ धानिवले, सरपंच नागेश मरगळे, उपसरपंच गणपत ढाकोळ, पोलीस पाटील सचिन भोरडे, रमेश बैकर, राजू शेळके, शत्रुघ्न बैकर, बाळू ढाकोळ आदी उपस्थित होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, मार्गदर्शक संदीप गाडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर,कार्याध्यक्ष सागर कुंभार, सोमनाथ बैकर, महेंद्र बैकर, तसेच, पिंपरी चिंचवड व कामशेत शहर गॅरेज असोसिएशनचे सदस्य यांनी प्रयत्न केले.

लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या शिवस्मारकावर सुंदर रांगोळ्या व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून भारत माता पूजन करण्यात आले. याप्रसंगी टाटा मोटर्सचे कर्मचारी भालकेश्वर यांचे वतीने आपत्कालीन कार्याबद्दल शिवदुर्ग मित्र लोणावळा यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार सुनिल गायकवाड व त्यांच्या इतर सदस्यांनी स्विकारला. नंतर शिवस्मारक परिसर व लोहगड किल्ल्याच्या पायऱ्यांवर हजारो दिवे लावण्यात आले होते. त्यामुळे पौर्णिमेच्या चांदण्याबरोबर लोहगड किल्ल्याचा परिसर उजळून निघाला होता. सर्व परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.