Lohgad : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड शिवस्मारकावर दीपोत्सव

एमपीसी न्यूज –  श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ( Lohgad ) ग्रामस्थांच्या वतीने लोहगड शिवस्मारकावर भव्य दिव्य असा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्या अलका, गणेश धानिवले, राजू शेळके, रमेश बैकर, शंकर चिव्हे, सोमनाथ बैकर,सागर धानिवले, महेंद्र बैकर, पोपट दिघे, बाळू ढाकोळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी हजारो दिव्यांनी लोहगड शिवस्मारक परिसर उजळून निघाला होता. सुंदर फुलांनी शिवस्मारक सजावट करण्यात आली होती. शिवरायांच्या जयघोषाने नवचैतन्य निर्माण झाले होते. त्रिपुरारी पौर्णिमेला  जोरदार पावसाने हजेरी लावली. भर पावसात कार्यकर्ते व ग्रामस्थ शिवस्मारकाची सजावट करत होते.पाऊस थांबल्यावर शिवस्मारक परिसरात  मोठा दीपोत्सव करण्यात आला .संजय मुरारी यांच्या संकल्पनेतून शिवरायांची भव्य रांगोळी या ठिकाणी साकार करण्यात आली होती.

लोहगड ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित सदस्यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सरपंच ( Lohgad ) सोनाली बैकर, उपसरपंच  ज्योती धानिवले, काजल ढाकोळ, स्वाती मरगळे,  स्नेहल बैकर,  महेश शेळके,  अभिषेक बैकर,  पंढरीनाथ विखार, अभिजीत काळे, विश्वनाथ पदमुले  यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शिवशंभू विचार मंचाचे विभाग प्रचारक अक्षय चंडेल यांनी शिवभक्तांना मार्गदर्शन केले. सरपंच सोनाली प्रमोद बैकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिवस्मारक परिसर विकासाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचा मनोदय सर्वांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे नियोजन सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, संदीप गाडे, सागर कुंभार, अनिकेत अंबेकर, चेतन जोशी, सचिन निंबाळकर, रुपेश लोखंडे, अमोल गोरे, गणेश उंडे, बसप्पा भंडारी, अमोल मोरे, रुपेश लोखंडे,अशोक भोसले,सचिन आमले,निलेश भोसले,संदीप भालेकर, मंगेश रावणे, संदीप बैकर, शिवतेज शेंडे, आदी कार्यकर्त्यांनी केले होते.

मंच, लोहगड घेरेवाडी ग्रामस्थ व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संघटित प्रयत्नातून आज दिमाखात पुन्हा कात टाकून उभा राहिलेला लोहगड आपणास पहायला मिळतो. मुख्य द्वाराला बसविलेला भक्कम सागवानी दरवाजा हा महाराष्ट्रातील पहिला किल्ला म्हणून हा मान लोहगडाला जातो.

मंच आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. लोहगडाच्या पायथ्याला भव्य शिवस्मारक उभे राहिले. मंचाच्या पाठपुराव्यामुळे लोहगडाचे तटबंदी, बुरुज, पायऱ्या, दिशादर्शक फलक इत्यादी दुर्गसंवर्धनाची कामे भारतीय पुरातत्व विभागामार्फत पूर्ण करण्यात ( Lohgad ) आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.