Pimpri : पिंपरी न्यायालयात संविधान दिन साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार (Pimpri)असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि. 26 ) पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे(Pimpri) माजी अध्यक्ष ॲड. दिनकर बारणे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष ॲड. सचिन थोपटे यांची उपस्थिती होती. यावेळी’संविधान आणि लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गोरक्ष लोखंडे यांचे व्याख्यान झाले. न्यायालयात झालेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमाची सांगता संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करून झाली.

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद शूरवीरांना आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुदाम साने, ॲड. सुनील कडुसकर, ॲड. नारायण रसाळ, माजी उपाध्यक्ष ॲड. प्रतीक जगताप, ॲड. अजित शिनगारे, माजी सचिव ॲड. निखिल बोडके, सभासद ॲड. नारायण थोरात, ॲड. राज जाधव, ॲड. वाकळे, ॲड. मानसी उदासी, ॲड. सारिका भोसले, ॲड. वैष्णवी काकडे, ॲड. विवेक राऊत, ॲड. वैभव कल्याणकर, ॲड. अजिंक्य लोमटे, वकील बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, खजिनदार ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. दशरथ बावकर, ॲड. फारुख शेख आणि ॲड. स्वाती गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सचिव ॲड. धनंजय कोकणे यांनी केले. सहसचिव ॲड. उमेश खंदारे यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.