Express Way : द्रुतगती मार्गावर टेम्पोला आग

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून चेन्नईच्या दिशेने(Express Way) जात असलेल्या टेम्पोला रविवारी (दि. 26) रात्री उशिरा आग लागली. ही घटना बोरघाटात घडली.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून आयसर टेम्पो मुबंईहून चेन्नईकडे (Express Way)जात होता. टेम्पो बोरघाटात आला असता अचानक त्याच्या केबिन मध्ये आग लागली. ही आग शॉर्टसर्किट होऊन लागली असल्याचे सांगितले जात आहे. या आगीत टेम्पो पूर्णपणे जळून खाक झाला. टेम्पोला आग लागताच टेम्पोचा चालक आणि सहप्रवासी हे तात्काळ बाहेर पडले. त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Chinchwad : चिंचवडमध्ये होणार इंडिया इंटरनॅशनल इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शन ;1 ते 3 डिसेंबर रोजी ऑटो क्लस्टर येथे होणार तीन दिवसीय प्रदर्शन

या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा आणि अग्निशमन विभाग यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी टेम्पोची आग विझवली. त्यानंतर टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.