Pimpri : होरपळ आणि वेदनेच्या वातावरणात मराठा भूषण पुरस्कार म्हणजे पहाडरूपी प्रेरणा – प्रा. गंगाधर बनबरे

एमपीसी न्यूज – सध्याच्या सामाजिक वातावरणात होरपळ आणि वेदना या एकाच (Pimpri ) कक्षेतून वारे सुरू असताना मराठा समजासह इतर समाजातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार देणे म्हणजे पहाडरूपी प्रेरणा आहे अशी भावना संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे यांनी आज व्यक्त केली. मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना मराठा भूषण व विविध समाजातील गुणवंतांचा कार्यकर्ता सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र राज्याच्या स्नेहा खेडेकर यांनी दीप प्रज्वलित करून (Pimpri ) केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष व कार्यक्रमाचे संयोजक ॲड. लक्ष्मण रानवडे होते. पुरस्कार वितरण मराठा भूषण व कार्यकर्ता सन्मान पुरस्कार अनुक्रमे संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय प्रवक्ते गंगाधर बनबरे व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कविता बहल यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.या कार्यक्रमास गंगाधर बनबरे व जिजाऊ ब्रिगेडच्या महासचिव स्नेहा खेडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी पिंपरी चिंचवड शहर शाखेचा आढावा घेतला.

या प्रसंगी मराठा भूषण पुरस्कार मा. धनाजी येलकर पाटील (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मराठा समाजाचे नेते) , मा. गोविंद वाकडे (ज्येष्ठ पत्रकार), मा. अमोल काकडे (युवा पत्रकार), मा. जगन्नाथ भोसले (उद्योजक) , मा. श्रीमती वृषाली मरळ (अध्यक्ष्या जेष्ठ नागरिक महासंघ पिंपरी चिंचवड) तर कार्यकर्ता सन्मान पुरस्कार माणिकराव बारगळ (ज्येष्ठ समाज सेवक ) राजू शंकर आवळे (लहुजी वस्ताद संघटनेचे शहराध्यक्ष )गोरोबा बोदल गुजर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) सतिश विठ्ठल कोल्हे (सामाजिक कार्यकर्ते) सौ. माणिक शिंदे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या), स्व. पंकज घाडगे (म. सेवा संघाचे माजी अध्यक्ष ) यांना मरणोत्तर पुरस्कार ,

नारायण पाटील (सामाजिक कार्यकर्ते मराठा समाज) मारुती किसन नवले (उत्तम खेळाडू व सामाजिक कार्यकर्ता) , संतोष म्हात्रे (क्रीडा प्राशिक्षक व सामाजिक कार्यकर्ते), मुगुटराव मोरे (सामाजिक कार्यकर्ते), रमेश गजाबा गायकवाड (पंचशील संघाचे माजी अध्यक्ष व आंबेडकरी विचारांचे अभ्यासक) आदींना प्रदान करण्यात आला.

Chinchwad : चिंचवडमध्ये होणार इंडिया इंटरनॅशनल इलेक्ट्रिक वाहन प्रदर्शन ;1 ते 3 डिसेंबर रोजी ऑटो क्लस्टर येथे होणार तीन दिवसीय प्रदर्शन

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक बबनराव गाढवे , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजरत्न शिलवंत , संभाजी ब्रिगेडचे इंजि. मनोज गायकवाड प्रमुख पाहुणे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून शारदाताई मुंडे व प्रकाश जाधव उपस्थित होते .

सुलभा यादव व त्यांच्या महिला सहकार्यांनी गायलेल्या जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली . कार्यक्रमाचे प्रस्ताविक (Pimpri ) संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष प्रवीण कदम यांनी केले. सूत्र संचालन सुनीता शिंदे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा सेवा संघाचे सचिन दाभाडे , गोविंद खामकर , प्रकाश बाबर, दिलीप गावडे, अशोक सिसोदे ,सुरेश इंगळे , सुभाष देसाई , मोहन जगताप , अण्णा सासवडे, आदिंनी मोठ्या प्रमाणात काम करून कार्यक्रम यशस्वी केला.

मराठा सेवा संघाचे आरोग्य कक्षाचे प्रमुख डॉ. मोहन पवार यांनी शहर मराठा सेवा संघाच्या विविध कक्षांच्या कार्याची माहिती देऊन सर्व पाहुण्याचे व उपस्थितांचे आभार मानले . कार्यक्रमाचे निवेदक सोमनाथ गाडे व प्राची धमके यांनी काम केले. व आंतराष्ट्रीय गायक कलाकार पी. चंद्रा यांनी मराठी व हिंदी गीतांसह नृत्याच्या सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रम उत्कृष्ट रित्या सादर केला व सर्वांचे मने (Pimpri ) जिकंली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.